तुमच्या खात्यात PM किसानचे पैसे जमा झाले का? झाले नसतील तर करा ‘हे’ काम अन्यथा….

तुमच्या खात्यात PM किसानचे पैसे जमा झाले का? झाले नसतील तर करा ‘हे’ काम अन्यथा….


PM Kisan : केंद्र सरकारनं काल (15 नोव्हेंबर) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan samman Nidhi Yojana) 15 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते झारखंडमधील कार्यक्रमात या हफ्त्याचे वितरण करण्यात आले. मात्र, अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसान सन्मान निधीचा 15 वा हफ्ता जमा झालेला नाही. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसान सन्मान निधीचा 15 वा हफ्ता जमा झाला नाही, त्यांनी नेमकं काय करावं, याबद्दलची माहिती पाहुयात.

ज्या शेतकऱ्यांचा PM किसान योजनेचा 15 वा हप्ता जमा झाला नसेल त्यांनी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची स्थिती तपासली पाहिजे. त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग झालेत की नाहीत हे तपासावे. तुम्ही तुमच्या बँकेची वेबसाइट किंवा मोबाईल अॅप वापरू शकता. याशिवाय शेतकरी बांधवांनी त्यांच्या जवळच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. तसेच शेतकरी बांधव पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक 155261 वर संपर्क साधू शकतात. तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन तक्रार देखील करू शकता.

पैसे न येण्याची अनेक कारणे

तुमच्या खात्यात पैसे न येण्याची अनेक कारणे असू शकतात. एक कारण म्हणजे तुमचे बँक खाते आधारशी लिंक केलेले नाही. ई-केवायसी नसल्याचीही शक्यता आहे. याशिवाय, असे देखील होऊ शकते की आपण अजिबात अर्ज केला नाही. जर तुम्ही ही सर्व आवश्यक कामे पूर्ण केली असतील तर तुमची तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला लवकरच पैसे मिळतील.

अशा प्रकारे तक्रार दाखल करु शकता

सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान वेबसाइटवर जाऊन लॉग इन करावे लागेल.
आता “रजिस्टर कंप्लेंट” पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर तुमची तक्रार लिहा.
तुमच्या तक्रारीसोबत तुमच्या कागदपत्रांच्या प्रती जोडा
तुमच्या तक्रारीत तुमचे नाव, पत्ता, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल क्रमांक समाविष्ट करा.
शेवटी शेतकरी बांधवांनी सबमिट बटणावर क्लिक करावे.

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता जारी केला.  पंतप्रधान मोदी यांनी ‘आदिवासी गौरव दिना’च्या निमित्ताने झारखंडमधील बिरसा कॉलेज, खुंटी येथून योजनेचा 15 वा हप्ता जारी केला. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये हस्तांतरित केले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या:

PM किसानचा 15 वा हफ्ता आज मिळणार, पण ‘हे’ शेतकरी लाभापासून राहणार वंचितSource link

Mazhar Paradise65

WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
x Logo: Shield Security
This Site Is Protected By
Shield Security
Verified by MonsterInsights