सुष्मिता सेनच्या आर्या-3 चा टीझर रिलीज; सीरिज ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

सुष्मिता सेनच्या आर्या-3 चा टीझर रिलीज; सीरिज ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस


Aarya Season 3 Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनच्या (Sushmita Sen) आर्या-3 (Aarya 3) या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आर्या-3 या वेब सीरिजचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरमध्ये सुष्मिता ही अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे.

आर्या-3 या वेब सीरिजच्या सुरुवातीला सुष्मितावर कोणीतरी गोळी झाडलेली दिसत आहे. त्यानंतर सुष्मिता जमिनीवर कोसळते. ‘जिस कहानी की शुरुआत मेरे हाथ में नहीं थी। उसका अंत मुझे ही करना था पर वो अंत ऐसा होगा मैंने सोचा नहीं था।’ हा सुष्मिताचा डायलॉग आर्या-3 या वेब सीरिजच्या टीझरमध्ये दिसतो. आर्या-3 या वेब सीरिजच्या टीझरमध्ये अभिनेता सिकंदर खेरची झलक देखील बघायला मिळत आहे. 

सुष्मिता सेननं सोशल मीडियावर आर्या-3 या वेब सीरिजचा टीझर शेअर केला आहे. या टीझरला तिनं कॅप्शन दिलं,  “जिसके सर पर ताज होता है, निशाना भी उसी पर होता है” सुष्मितानं शेअर केलेल्या टीझरवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

आर्या-3 या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. ही वेब सीरिज  3 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  ही  सीरिज Disney Plus Hotstar  या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक पाहू शकतात. आर्या ही वेब सीरिज आर्या सरीन या महिलेच्या आयुष्यावर आधारित आहे. आर्या-3 या वेब सीरिजमध्ये सुष्मिता सेनच्या मुलीची भूमिका वीरती वाघानीनं साकारली आहे आणि  मुलाची भूमिका विरेन वझिरानीनं साकारली आहे.

पाहा टीझर

आर्या या सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या सीझनमध्ये सुष्मितासोबतच  चंद्रचूर सिंह, नमित दास, अंकुर भाटिया  आणि विकास कुमार या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता प्रेक्षक आर्या-3 ची उत्सुकतेने वाट बघत आहेत. सुष्मिताची ताली ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी रिलीज झाली. या वेब सीरिजचं अनेकांनी कौतुक केलं.

इतर महत्वाच्या बातम्या:

Aarya 3: ‘शेरनी के लौटने का वक्त आ गया है’; सुष्मिताच्या आर्या-3 वेब सीरिजची रिलीज डेट जाहीर

 

Source link

Avatar Of Mazhar Paradise65

Mazhar Paradise65

WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
x Logo: Shield Security
This Site Is Protected By
Shield Security
Verified by MonsterInsights