‘बिग बॉस 17’च्या घरात अंकिता लोखंडे प्रेग्नंट? म्हणाली,’मला पीरियड्स आलेले नाहीत’

‘बिग बॉस 17’च्या घरात अंकिता लोखंडे प्रेग्नंट? म्हणाली,’मला पीरियड्स आलेले नाहीत’


Ankita Lokhande : ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17) या कार्यक्रमाची स्पर्धक अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या प्रेग्नंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. अंकिताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री म्हणत आहे की तिला पाळी आलेली नाही. तसेच तिची प्रेग्नंसी टेस्टदेखील झाली आहे. विकीसोबत (Vicky Jain) बोलतानाचा अंकिताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘बिग बॉस 17’मधील चर्चेत असणाऱ्या व्यक्तींमध्ये अंकिता लोखंडेचा समावेश आहे. विकी जैन (Vicky Jain) ते सुशांत सिंह राजपूतपर्यंत (Sushant Singh Rajput) वेगवेगळ्या विषयांवर अंकिताने या घरात भाष्य केलं आहे. पण आता ‘बिग बॉस 17’च्या घरात अंकिताला मळमळ आणि उलट्यांचा त्रास व्हायला लागला आहे. तसेच आंबट पदार्थ खाण्याची इच्छा होत आहे. अंकिताला पाळीदेखील आलेली नाही”.

अंकिता लोखंडेची ‘Bigg Boss’च्या घरात प्रेग्नन्सी टेस्ट

अंकिता लोखंडेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता विकीला सांगत आहे की,”सध्या मी खूप कन्फ्यूज आहे. माझी प्रेग्नंसी टेस्ट देखील झाली आहे.   प्रेग्नंसी टेस्टसह ब्लड टेस्ट आणि यूरिन प्रेग्नंसी टेस्टदेखील झाली आहे. मला पाळीदेखील आलेली नाही. मी खरचं प्रेग्नंट आहे की नाही हे मला माहिती नाही. पण आता मला घरी जायचं आहे”.

अंकिता-विकी आता वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहणार 

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांना ‘बिग बॉस’च्या घरात वेगवेगळ्या खोल्यांमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. अंकिता सुरुवातीपासून ‘दिल’ या खोलीत आहे. पण विकीला आता दिलमधून ‘दिमाग’ या खोलीत शिफ्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अंकिता नाराज असून या कारणाने त्यांच्यात भांडणदेखील झालं आहे.

‘बिग बॉस’च्या घरात अंकिता देणार गोड बातमी?
   
‘बिग बॉस 17’च्या घरात दोन लग्न झालेली जोडपी आहेत. यात अंकिता लोखंडे आणि विकी जैनचा समावेश आहे. तर नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्माचंदेखील लग्न झालेलं नाही. आता ‘बिग बॉस 17’च्या घरात अंकिता लोखंडे गोड बातमी देणार का याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. अंकिता लोखंडेच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या असल्या तरी नेटतरी मात्र विकी जैनला ट्रोल करत आहेत. 

संबंधित बातम्या

Ankita Lokhande Sushant Singh Rajput : अंकिता लोखंडेचा ‘बिग बॉस’च्या घरात सुशांतसिंह राजपूतबाबत मोठा दावा, म्हणाली..





Source link

Avatar Of Mazhar Paradise65

Mazhar Paradise65

WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
x Logo: Shield Security
This Site Is Protected By
Shield Security
Verified by MonsterInsights