‘बिग बॉस’च्या घरात राखी सावंतची वाइल्ड कार्ड एन्ट्री? घरातील स्पर्धकांचं जगणं होणार मुश्किल

‘बिग बॉस’च्या घरात राखी सावंतची वाइल्ड कार्ड एन्ट्री? घरातील स्पर्धकांचं जगणं होणार मुश्किल


Rakhi Sawant Enter in Bigg Boss 17 : ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांची खेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. दिवसेंदिवस या कार्यक्रमात नव-नवे ट्विस्ट येत आहेत. आता या कार्यक्रमात बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतची (Rakhi Sawant) वाइल्ड कार्ड एन्ट्री होऊ शकते, असे म्हटले जात आहे. 

‘बिग बॉस 17’ हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांनी पाहावा आणि कार्यक्रमाचा टीआरपी वाढावा यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. पण स्पर्धकांची खेळी ‘बिग बॉस’ प्रेमींच्या पसंतीस उतरत असली तरी टीआरपीवर मात्र या कार्यक्रमाचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. त्यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याच्या हेतून या कार्यक्रमात आता वाइल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री होणार आहे. यात राखी सावंतच्या (Rakhi Sawant) नावाचाही समावेश आहे. या पर्वाचा टीआरपी वाढावा यासाठी निर्माते राखीला या कार्यक्रमात सहभागी करुन घेत आहेत, असे म्हटले जात आहे.

आदिल खान दुर्रानीसोबत राखी सावंतची एन्ट्री होणार? 

‘बिग बॉस 17’ या वादग्रस्त कार्यक्रमात आता राखी सावंतची एन्ट्री होणार आहे. ‘बिग बॉस 17’ या कार्यक्रमातून ‘बिग बॉस’ आता पाच बोरिंग स्पर्धकांचा पत्ता कट करणार असल्याचं म्हटलं जात आहे. नाविद सोल या स्पर्धकापासून याची सुरुवात झाली आहे. नाविदचं मिड वीक एविक्शन झालं आहे. लवकरच आणखी स्पर्धकांचा पत्ता कट होणार असा दावा करण्यात आला आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, नको असलेले स्पर्धक बाहेर पडल्यानंतर निर्माते सहा वाइल्ड कार्ड स्पर्धकांची ‘बिग बॉस 17’च्या घरात एन्ट्री करतील. ‘बिग बॉस 17’मध्ये राखी सावतंची एन्ट्री होणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण आदिल खान दुर्रानीसह (Adil Khan Durrani) राखीची एन्ट्री होईल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरात चांगलाच धमाका होणार आहे.

राखी सावंतची ‘बिग बॉस’च्या घरात अनेक पर्वांमध्ये एन्ट्री झाली आहे. ‘बिग बॉस’च्या पहिल्या भागापासून राखी सावंत या कार्यक्रमाशी जोडली गेली आहे. त्यानंतर अनेक पर्वांमध्ये राखीला कार्यक्रमाचा टीआरपी वाढावा यासाठी कार्यक्रमात विचारणा झाली आहे.’बिग बॉस 15’ या कार्यक्रमात राखी तिचा त्यावेळीचा पती रितेशसोबत सहभागी झाली होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून रितेशचा चेहरा राखीने पहिल्यांदा सर्वांसमोर आणला. 

संबंधित बातम्या

Ankita Lokhande : सुशांत सिंह राजपूतच्या अंत्यसंस्काराला अंकिता लोखंडे का गेली नव्हती? ‘Bigg Boss’च्या घरात अभिनेत्रीने सांगितलं कारणSource link

MPardasi65

WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
x Logo: Shield Security
This Site Is Protected By
Shield Security
Verified by MonsterInsights