गौतमीच्या कार्यक्रमात साप आल्याने गोंधळ; खुर्च्यांची तोडफोड करत तरुणांचा धिंगाणा

गौतमीच्या कार्यक्रमात साप आल्याने गोंधळ; खुर्च्यांची तोडफोड करत तरुणांचा धिंगाणा


Gautami Patil : लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलने (Gautami Patil) आपल्या नृत्याने सर्वांना वेड लावलं आहे. तरुणांसह, लहान मुले आणि वयोवद्धांनाही गौतमीने वेड लावलं आहे. आता गौतमीच्या नृत्याची सापालाही भूरळ पडल्याचं समोर आलं आहे. नवी मुंबईतील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात साप शिरला होता. 

नवी मुंबईतील कामोठे मानसरोवर परिसरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या कार्यक्रमादरम्यान चक्क साप शिरला आणि गोंधळ व्हायला सुरुवात झाली. दरम्यान एका सर्पमित्राने तो साप पकडला. त्यामुळे अनर्थ टळला. 

गौतमीच्या कार्यक्रमाची सापालाही भूरळ (Gautami Patil Dance)

अजित पवार गटाचे नेते सचिव राजकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा आणि चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. पण या कार्यक्रमात सापाने एन्ट्री घेतली आणि गौतमीच्या कार्यक्रमाची सापालाही भूरळ पडल्याच्या चर्चांना सुरुवात झाली.

गौतमीच्या कार्यक्रमात तरुणांचा धिंगाणा

नवी मुंबईतील कामोठे मानसरोवर परिसरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीचे संघटक राजकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाला तरुणांनी तुफान गर्दी केली आणि धिंगाणा घातला. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचा धाक दाखवावा लागला. दरम्यान उत्साही प्रेक्षकांनी खुर्च्यांची तोडफोड केली. 

‘सबसे कातील गौतमी पाटील’ आपल्या हटके अदांमुळे अल्पावधीतच चांगलीच लोकप्रिय झाली आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन होत असतं. गौतमीचा कार्यक्रम म्हटला की गोंधळ, राडा या गोष्टी आल्याच. पण आता नवी मुंबईतील तिचा कार्यक्रम पाहायला खास पाहुणा आला होता. सापाने तिच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने चाहत्यांनी गोंधळ केला. 

गौतमीचा मोठा चाहतावर्ग असला तरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरात तिला नो एन्ट्री आहे. सप्टेंबर महिन्यातील कोल्हापुरातील गौतमीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. त्यानंतर 7 आणि 8 ऑक्टोबरला सिंधुदुर्गातील कुडाळ आणि कणकवलीमध्ये होणारा गौतमीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. तांत्रिक कारणांमुळे कार्यक्रम रद्द करत असल्याचं कारण आयोजकांनी दिलं होतं.

संबंधित बातम्या

Ahmednagar : अखेर ‘रयत’च्या दादा पाटील महाविद्यालयात ‘लावणी’ झालीच, आयोजक म्हणाले, भाजपचं आक्षेप बिनबुडाचा

Source link

Avatar Of Mazhar Paradise65

Mazhar Paradise65

WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
x Logo: Shield Security
This Site Is Protected By
Shield Security
Verified by MonsterInsights