हाताला काळी पट्टी बांधली आणि मगच वर्ल्डकप फायनल खेळली; मिचेल स्टार्कनं असं का केलं?

हाताला काळी पट्टी बांधली आणि मगच वर्ल्डकप फायनल खेळली; मिचेल स्टार्कनं असं का केलं?


ICC World Cup Final IND vs AUS : वर्ल्डकप 2023 च्या (World Cup 2023) ट्रॉफीवर ऑस्ट्रेलियानं (Australia) मोठ्या थाटात आपलं नाव कोरलं. विश्वचषकाच्या (ICC Wolrd Cup Final 2023) सुरुवातीपासून एकही सामना न गमावलेल्या टीम इंडियाला (Team India) मोठ्या शिताफीनं नमवून कांगारूंनी आपला सहावा वर्ल्डकप जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या सर्वच धडाकेबाज खेळाडूंवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण यामध्ये विशेष चर्चा रंगल्यात त्या ऑसी संघाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या (Mitchell Starc).

ऑसी संघाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनं टीम इंडियाविरुद्धच्या ब्लॉकबस्टर वर्ल्डकप फायनलमध्ये असं काही केलं की त्यामुळे त्यानं सर्वांची मनं जिंकली. अहमदाबादमधील 132,000 क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमवर ऐतिहासिक निर्णायक सामन्याचा पहिला चेंडू टाकणाऱ्या स्टार्कनं स्वतःच्या उजव्या हातावर काळी पट्टी बांधली होती. या पट्टीनं विशेष लक्ष वेधून घेतलं. स्टार्कव्यतिरिक्त ही काळी पट्टी फक्त स्टीव्ह स्मिथच्या हातावर दिसत होती. स्टार्कच्या हातातील काळ्या पट्टीवर ‘PH’ लिहिलं होतं. अनेकदा या काळ्या पट्टीनं सर्वांचं लक्ष वेधलं, पण हे प्रकरण नेमकं काय कोणाच्याच लक्षात आलं नाही. 

स्टार्कनं हातावर काळी पट्टी का बांधली?

मिशेल स्टार्कनं हातावर काळी पट्टी का बांधली? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. सोशल मीडियावरही याबाबत अनेक चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. मिचेल स्टार्कचा माजी सहकारी फिलिप ह्युजला (Phillip Hughes) श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यानं ही काळी पट्टी आपल्या उजव्या हातावर बांधली होती. ऑसी संघाचा डावखुरा फलंदाज ह्युज म्हणजे, ऑस्ट्रेलियाचं वादळ आणि भविष्यातला संघाचा धुरंधर. ह्युजनं आपल्या हयातीत ऑस्ट्रेलियासाठी 26 कसोटी आणि 25 एकदिवसीय सामने खेळले. मात्र, काळाला जणू हे मान्यच नव्हतं. 2014 मध्ये न्यू साउथ वेल्सकडून खेळताना मैदानातच झालेल्या एका अपघातात ह्यूजचा दुर्दैवी मृत्यू झाला.

बाउन्सर डोक्यावर लागला अन् ह्यूज मैदानातच कोसळला 

25 वर्षांच्या ह्यूज ऑस्ट्रेलियाचा भविष्यातील उगवता तारा होता. एका सामन्यादरम्यान मैदानात खेळताना ह्यूजच्या मानेवर बाउन्सरचा फटका बसला आणि तो क्षणार्धात मैदानात कोसळला. ह्यूजला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तो वाचला नाही. स्टार्क आणि ऑस्ट्रेलियन संघातील जवळपास सर्वचजण ह्यूजच्या अगदी जवळ होते. ह्यूजच्या आकस्मित निधनानं ऑसी संघावर दुःखाचा डोंगर कोसळला. ह्यूजला अजूनही त्याचे मित्र आणि सहकारी असलेले काही खेळाडू विसरलेले नाहीत. अनेक सामन्यांमध्ये ते ह्यूजच्या आठवणींसोबत खेळताना दिसतात. 2015 च्या विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्येही मिचेल स्टार्क काळ्या हाताची पट्टी बांधून मैदानावर खेळायला आला होता. त्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकेल क्लार्कनेही हातावर काळी पट्टी बांधली होती.

ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा चॅम्पियन

अंतिम सामना 6 गडी राखून जिंकून ऑस्ट्रेलियानं सहाव्यांदा विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात स्टार्क सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं शुबमन गिलसह केएल राहुल आणि मोहम्मद शामीला 55 धावांवर बाद केलं. शेवटच्या स्पेलमध्ये स्टार्कलाही रिव्हर्स स्विंग मिळत होते. त्यामुळे फलंदाजी अधिक कठीण झाली.



Source link

MPardasi65

WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
x Logo: Shield Security
This Site Is Protected By
Shield Security
Verified by MonsterInsights