‘कॉफी विथ करण’साठी करीना कपूर अन् आलिया भट्टने घातला ‘इतका’ महागडा ड्रेस

‘कॉफी विथ करण’साठी करीना कपूर अन् आलिया भट्टने घातला ‘इतका’ महागडा ड्रेस


Koffee With Karan 8 : करण जोहरचा (Karan Johar) लोकप्रिय कार्यक्रम ‘कॉफी विथ करण 8’ (Koffee With Karan 8) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागात बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) हजेरी लावणार आहेत. ‘कॉफी विथ करण 8’ या कार्यक्रमासाठी करीना आणि आलियाने महागडा ड्रेस परिधान केला आहे.

‘कॉफी विथ करण 8’च्या चौथ्या भागात बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि आलिया भट्ट हजेरी लावणार आहेत. दोघीही आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्री असल्या तरी करीना नात्याने आलियाची ननंद आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागाचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रोमोमध्ये आलिया आणि करीनाचा फॅशनेबल लूक पाहायला मिळत आहे.

आलिया-करीनाचा ग्लॅमरस लूक!

आलिया भट्टने करीना कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना चॉकलेटी रंगाचा शिमरी गाउन परिधान केला होता. फिगर फिटिंगच्या या स्टायलिश ड्रेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आलियाने हा शिमर ड्रेस लूक पूर्ण करण्यासाठी या ड्रेसवर मॅचिंग हील्स घातले होते. आलियाचा हा ड्रेस भाव खाऊन गेला आहे.

करीना कपूरच्या ड्रेसनेदेखील चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. करीनानेदेखील स्टायलिश लूक केला होता. ब्लॅक अॅन्ड व्हाइट मोनोक्रोमॅटिक लूकमध्ये बेबो खूपच सुंदर दिसत होती. तिने पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर टॉप आणि फिगर फिटिंग डिटेलिंग असलेली मैक्सी स्कर्ट परिधान केला होता. 

आलिया-करीनाचा महागडा ड्रेस

‘कॉफी विथ करण 8’ या कार्यक्रमासाठी आलिया भट्ट आणि करीना कपूरने महागडा ड्रेस परिधान केला होता. आलियाने घातलेल्या चॉकलेटी रंगाच्या शिमरी ड्रेसची किंमत 1550 डॉलर म्हणजेच जवळपास 1.28 लाख रुपये आहे. तर करीना कपूरने घातलेल्या ड्रेसचे किंमत 74 हजार रुपये आहे. आलिया भट्ट आणि करीना कपूरचा ड्रेस तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला हा लूक कॉपी करायचा असेल तर त्यांच्या कपड्यांच्या किंमती जाणून तुम्ही हैराण व्हाल. 

‘कॉफी विथ करण 8’च्या मंचावर करीना कपूर आणि आलिया भट्टने करण जोहरसह वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. दोघींनीही अनेक खुलासे केले आहेत. दरम्यान बेबो म्हणाली की,”करण जोहरला अनफॉलो करायला मला आवडेल. करणचा पाउट सेल्फी पसंतीस न उतरल्याने बेबो त्याला अनफॉलो करणार आहे”. 

‘कॉफी विथ करण 8’च्या मंचावर आतापर्यंत दीपिका पादुकोण-रणवीर सिंह, सनी देओल-बॉबी देओल, सारा अली खान- अनन्या पांडे या जोड्यांनी हजेरी लावली आहे. रानी मुखर्जी, काजोल, अजय देवगन, रोहित शेट्टीसह अनेक सेलिब्रिटी कार्यक्रमाच्या आगामी भागात हजेरी लावणार आहेत. डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षक हा कार्यक्रम पाहू शकतात.

संबंधित बातम्या

Koffee With Karan : विषय अमिषा पटेलचा निघाला अन् करिना कपूरमध्ये ‘गदर’चा सनी देओल जागा झाला! भाभीवरूनही भलतीच पेटली

Source link

MPardasi65

WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
x Logo: Shield Security
This Site Is Protected By
Shield Security
Verified by MonsterInsights