AI ने लावलं प्रभास-अनुष्का शेट्टीचं लग्न; बाळासोबतचा फोटोही व्हायरल

AI ने लावलं प्रभास-अनुष्का शेट्टीचं लग्न; बाळासोबतचा फोटोही व्हायरल


Prabhas Anushka Shetty Wedding Photo Viral on Social Media : ‘बाहुबली’नंतर (Baahubali) नंतर प्रभास (Prabhas) आणि अनुष्का शेट्टीची (Anushka Shetty) पॅन इंडिया फॉलोइंग झाली आहे. देशभरात त्यांचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील या कलाकारांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

प्रभास आणि अनुष्का शेट्टी रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे. दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्यावर भाष्य केलेलं नाही. आमच्यात फक्त निखळ मैत्री आहे, असं ते सांगत आले आहेत. पण प्रभास आणि अनुष्काने लग्न करावं, अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. आता एआयने बनवलेले प्रभास आणि अनुष्काचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

प्रभास-अनुष्काचे फोटो व्हायरल

प्रभास आणि अनुष्काचा मोठा चाहतावर्ग आहे. ऑनस्क्रीनच नव्हे तर ऑफस्क्रीनदेखील प्रभास आणि अनुष्काला एकत्र पाहायला चाहत्यांना आवडतं. दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. अशातच आता त्यांचे एआयने बनवलेले फोटो व्हायरल होत आहेत. काही फोटो लग्नसोहळ्यातील असून एका फोटोमध्ये तर त्यांच्यासोबत एक बाळदेखील दिसत आहे.

प्रभास आणि अनुष्का शर्मा 2009 मध्ये ‘बिल्ला’ या तेलुगू सिनेमाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. एकमेकांच्या कामाचा ते कायमच आदर करत आले आहेत. प्रभासचा ‘सालार’ आणि ‘कल्कि 2898 एडी’ हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. तर दुसरीकडे अनुष्का शेट्टीच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे. ‘मिस अॅन्ड मिस्टर पोलीशेट्टी’ या सिनेमात ती शेवटची झळकली होती. लवकरच एका प्रोजेक्टमध्ये प्रभास आणि अनुष्का शेट्टी एकत्र झळकणार आहेत. त्यामुळे आता रुपेरी पडद्यावर त्यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अनुष्का आता ‘Kathanar – The Wild Sorcerer’ या मल्याळम सिनेमात दिसणार आहे.

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan Vs Prabhas : किसमें कितना है दम.. ख्रिसमसमध्ये शाहरुख अन् प्रभास येणार आमने-सामने; कोण रचणार इतिहास?

Source link

Avatar Of Mazhar Paradise65

Mazhar Paradise65

WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
x Logo: Shield Security
This Site Is Protected By
Shield Security
Verified by MonsterInsights