फायनल सुरू असताना गिल, अय्यरबद्दल शाहिद आफ्रिदी जे बोलला, त्याच्याशी तुम्हीही सहमत व्हाल?

फायनल सुरू असताना गिल, अय्यरबद्दल शाहिद आफ्रिदी जे बोलला, त्याच्याशी तुम्हीही सहमत व्हाल?


Shahid Afridi On WC 2023 Final: वर्ल्डकप 2023 मध्ये (ICC World Cup 2023) सुरुवातीपासून धडाकेबाज कामगिती करणारी टीम इंडिया (Team India) फायनलमध्ये (World Cup Final) मात्र कुठेतरी कमी पडली. ऑसी संघानं (Austrelia) टीम इंडियावर (Team India) मात करत वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. पण ज्यावेळी टीम इंडिया फायनलच्या सामन्यात फलंदाजी करत होती, त्यावेळी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनं (Shahid Afridi) लाईव्ह टीव्हीवर केलेलं वक्तव्य सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे. कधी कधी अति आत्मविश्वास तुम्हाला खड्ड्यात घालतो, असं वक्तव्य शाहीद आफ्रिदीनं लाईव्ह शोदरम्यान केलं आहे. फायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचं हे वक्तव्य सोशल मीडियालर प्रचंड व्हायरल होत आहे.

टीम इंडिया वर्ल्डकप 2023 च्या फायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करत होती, त्यावेळी पाकिस्तानच्या ‘समा टीव्ही’ नावाच्या वृत्तवाहिनीवर एक लाईव्ह कार्यक्रम सुरू होता. त्या कार्यक्रमात पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि काही क्रिडा समीक्षक उपस्थित होते. त्यांच्यात वर्ल्डकप 2023 चा टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याबाबत चर्चा सुरू होती. शाहीद आफ्रिदीसोबतच या कार्यक्रमात मोहम्मद युसूफही उपस्थित होते. विश्वचषकाच्या फायनलमध्ये पहिल्या पॉवरप्लेमध्ये टीम इंडिया कांगारूंच्या कचाट्यात सापडलेली असतानाच शाहीद आफ्रिदीनं भारतीय फलंदाजांना आपल्या निशाण्यावर घेतलं होतं. शुभमन गिल आणि रोहित शर्मा काहीशा अंतरानं आऊट झाल्यानंतर शाहीद आफ्रिदीनं हे वक्तव्य केलं आहे. शुभमन गिल निष्काळजीपणे आणि रोहित शर्मा अनावश्यक शॉट मारताना आऊट झाल्याचं आफ्रिदी म्हणाला. 

“सलग जिंकल्यानंतर ओव्हर कॉन्फिडन्स येतोच”

फायनलच्या अकराव्या ओव्हरमध्ये श्रेयस अय्यरच्या रूपानं टीम इंडियानं तिसरी विकेट गमावली तेव्हा अँकरनं शाहिद आफ्रिदीला विचारलं की, हे मोठ्या सामन्याचं दडपण आहे का? यावर आफ्रिदी म्हणाला, “नाही, हे मोठ्या सामन्याचं दडपण नाही. त्यांच्यात आत्मविश्वास आहे. एवढ्या गर्दीसमोर खेळत आलेयत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे पूर्णपणे दबावावर आधारित आहे. हे त्यांना माहीत आहे. जेव्हा तुम्ही सतत सामने जिंकत राहता तेव्हा तुमचा आत्मविश्वासही वाढतो. आणि हाच आत्मविश्वास तुम्हाला खड्ड्यात घालतो. कारण ज्या चेंडूंवर ते आऊट झालेत ते चेंडू अजिबात विकेट्स देणारे नव्हते. 

टीम इंडियाच्या स्वप्नांचा चक्काचूर 

वर्ल्डकप फायनलमध्ये पहिले तीन विकेट लवकर गमावल्यानं टीम इंडिया दडपणाखाली दिसली. पहिल्या पॉवरप्लेनंतर विराट कोहली आणि केएल राहुलनं अतिशय संथ भागीदारीत धावा केल्या. ऑस्ट्रेलियन गोलंदाजही ठराविक अंतरानं विकेट घेत होते. याचा परिणाम असा झाला की, भारतीय क्रिकेट संघ अवघ्या 240 धावांवर गडगडला. यानंतर ऑस्ट्रेलियानं लक्ष्याचा सहज पाठलाग केला. अंतिम सामना 6 गडी राखून जिंकून ऑस्ट्रेलियानं सहाव्यांदा विश्वचषक ट्रॉफी जिंकली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

‘त्याच्या’ आठवणीत फायनलमध्ये हातावर काळी पट्टी बांधून खेळला मिचेल स्टार्क; ऐकाल तर तुमचेही डोळे पाणावतील!





Source link

Avatar Of Mazhar Paradise65

Mazhar Paradise65

WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
x Logo: Shield Security
This Site Is Protected By
Shield Security
Verified by MonsterInsights