‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका

‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका


Shivrayancha Chhava Teaser Out: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar)  यांच्या “शिवरायांचा छावा” (Shivrayancha Chhava) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. दिग्पाल यांचा  ‘सुभेदार’ (Subhedar)  हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला होता. आता त्यांचा शिवरायांचा छावा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.

 ‘हा’ अभिनेता साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका 

शिवरायांचा छावा या चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. हे पोस्टर पाहिल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला होता की, “शिवरायांचा छावा” या चित्रपटात  छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोणता अभिनेता साकारणार? आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. दिग्दपाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर “शिवरायांचा छावा” या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये अभिनेता भूषण पाटील हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. 

“शिवरायांचा छावा” या चित्रपटाच्या टीझरच्या सुरुवातीला घनदाट जंगल दिसते. त्यानंतर एक वाघ दिसतो. त्या वाघाच्यासमोर  छत्रपती संभाजी महाराज  यांची भूमिका साकारणारा अभिनेता  भूषण पाटील उभा आहे, असं दिसतं. अशातच छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा भूषण हा वाघाची शेपूट धरुन त्याला फरफटत घेऊन जातो, असं दिसत आहे. या टीझरला दिग्पाल लांजेकर यांनी कॅप्शन दिलं, “कोण शत्रू यावरी
करील कैसा कावा,वाघालाही फाडतो हा “शिवरायांचा छावा”.छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता भूषण पाटील.”  “शिवरायांचा छावा” या चित्रपटाच्या टीझरवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

पाहा टीझर:

 कधी रिलीज होणार ‘शिवरायांचा छावा’ चित्रपट ?

‘फर्जंद’ (Farzand), ‘फत्तेशिकस्त’ (Fatteshikast), ‘पावनखिंड’ (Pawankhind) आणि ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj), ‘सुभेदार’ (Subhedar)  या दिग्पाल लांजेकर यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता त्यांच्या ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट 16 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच  दिग्पाल लांजेकर  यांचा मुक्ताई या चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संबंधित बातम्या:

Digpal Lanjekar : “सह्याद्री सांगतो, पराक्रमाची गाथा”; ‘सुभेदार’ च्या यशानंतर दिग्पाल लांजेकरांचा ‘शिवरायांचा छावा!’ सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीस





Source link

Mazhar Paradise65