Smartwatch खरेदी करताय? जरा थांबा, या 5 गोष्टी आधी चेक करा, नाहीतर…

Smartwatch खरेदी करताय? जरा थांबा, या 5 गोष्टी आधी चेक करा, नाहीतर…


Smartwatch Features : सध्या अनेकांमध्ये महागड्या (Smartwatch Features) घड्याळांची क्रेझ आहे. वेगवेगळ्या कंपन्या आणि फिचर्स असलेले घडाळं अनेक लोक विकत घेतात. त्यात साध्या नेहमीच्या घडाळ्यांपेक्षा स्मार्टवॉचची क्रेझ जास्त दिसून येते. सुंदरही दिसते आणि सोबतच स्मार्ट लूक पण कॅरी करता येतो. सध्या स्मार्टवॉच वेगवेगळ्या आकाराच्या आणि डिझाईन्सच्या मिळतात मात्र या वॉचमध्ये तुम्ही सौंदर्य आणि डिझाईन न पाहता यातील फिचर्स तुम्ही बघायला हवेत. खरं तर स्मार्टवॉचच्या माध्यमातून तुम्ही स्वत:ला फिट तर ठेवू शकतात, पण स्मार्टवॉच जीवनरक्षक डिव्हाइस बनू शकतात.स्मार्टवॉच खरेदी करताना आपण सावधगिरी बाळगली पाहिजे पाहुयात….

कनेक्टिविटी चेक करा….

सध्या बाजारात दोन प्रकारचे स्मार्टवॉच उपलब्ध आहेत. एक अँड्रॉइड आणि दुसरा आयओएस. सर्व स्मार्टफोन या दोन ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करतात. अशावेळी तुम्ही नेहमी अँड्रॉइड तसेच आयओएस कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करणारी स्मार्टवॉच खरेदी करावी.

डिस्प्ले चेक करा…

कोणत्याही स्मार्टवॉचचा डिस्प्ले हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. यावर सगळे फिचर्स दिसत असतात. अशावेळी स्मार्टवॉच खरेदी करताना डिस्प्लेचा दर्जा चांगला असावा. जेणेकरून डिस्प्ले डेली टास्क सहज करू शकेल, हे लक्षात घ्यायला हवं. जर घड्याळात एमोलेड डिस्प्ले असेल तर ते अधिक चांगले होईल.

हेल्थ फीचर्स कोणते आहेत ते बघा…

स्मार्टवॉचमध्ये रनिंग, स्विमिंग, हार्ट रेट मॉनिटर सारखे महत्त्वाचे फीचर्स असायला हवेत. तसेच त्यांची एक्यूरेसी तपासली पाहिजे. कारण हेल्थ फीचर्ससाठी वॉचमध्ये चांगला सेन्सर असणं गरजेचं आहे. अशावेळी सेन्सरची माहिती मिळवणे आवश्यक आहे. अनेक फिटनेस फ्रिक लोक महागडे वॉच विकत घेतात मात्र हे फिचर नीट काम करणारं नसेल तर त्यांचे पैसे वाया जाऊ शकतात. 

पॉवर बॅकअप नक्की बघा…

बॅटरी लाईफ जास्त असणारे घड्याळ खरेदी करा. साधारणत: कमीत कमी एक दिवसाची बॅटरी लाईफ असणारी स्मार्टवॉच खरेदी करावीत. यापेक्षा कमी बॅटरी असलेले घड्याळ घेण्याच अर्थ नाही.

किंमत नक्की बघा… 

कोणत्याही स्मार्टवॉचची किंमत त्याच्या फीचर्स आणि एक्यूरेसी अवलंबून असते. अशावेळी युजरने आधी आपलं बजेट ठरवायला हवं. त्यानुसार त्या बजेटमध्ये चांगले फीचर्स असलेले घड्याळ शोधावे. सध्या बाजारात 2 हजार पासून ते लाखभर रुपयांपर्यंत स्मार्ट वॉच उपलब्ध आहेत. 

इतर महत्वाची बातमी-

iPhone Call Recording : काय सांगता? iphone वर तुम्ही सहजपणे कॉल रेकॉर्ड करू शकता, कसं? ते एकदा पाहाच!Source link

Mazhar Paradise65

WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
x Logo: Shield Security
This Site Is Protected By
Shield Security
Verified by MonsterInsights