नाणेफेक आफ्रिकेच्या पारड्यात, सामना कोण जिंकणार? ऑस्ट्रेलियाची प्रथम गोलंदाजी, पाहा प्लेईंग 11

नाणेफेक आफ्रिकेच्या पारड्यात, सामना कोण जिंकणार?  ऑस्ट्रेलियाची प्रथम गोलंदाजी, पाहा प्लेईंग 11


SA vs AUS, World Cup semi Final : दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. दक्षिण आफ्रिकेने महत्वाच्या सामन्यात एक बदल केला आहे. तरबेज शम्सीला संघात स्थान दिलेय. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या संघात स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल परतले आहेत.  तर स्टॉयनिस आणि सीन एबॉट यांना बाहेर बसवलेय. 

विश्वचषकाच्या साखळीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघांनी नऊपैकी सात सामने जिंकून, प्रत्येकी 14 गुणांची कमाई केली होती. पण नेट रनरेटच्या निकषावर दक्षिण आफ्रिकेनं गुणतालिकेत दुसरा आणि ऑस्ट्रेलियानं तिसरा क्रमांक पटकावला होता. पण उभय संघांमध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाचा 134 धावांनी धुव्वा उडवला होता. आज ऑस्ट्रेलिया हिशोब चुकता करणार की आफ्रिका फायनलमध्ये पोहचणार ? हे काही तासांमध्येच समजणार आहे.

भारताविरोधात फायनलमध्ये कोण भिडणार ?

रोहित शर्माच्या भारतीय संघानं न्यूझीलंडचं आव्हान 70 धावांनी मोडीत काढून विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली. विश्वचषकाची ही फायनल रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येईल. आणि फायनलच्या रणांगणात भारतीय संघाचा मुकाबला कोणत्या संघाशी होणार याचा फैसला आज कोलकात्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन बलाढ्य संघांमध्ये होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन-

क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी वान डेर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेविड मिलर, मार्को यॉन्सेन, गॅराल्ड कोएत्ज़ी, केशव महाराज, कगीसो रबाडा, तरबेज शम्सी

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन –

डेविड वार्नर, ट्रेविस हेड, मिशेल मार्श, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, जोश इंगलिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मिशेल स्टार्क, पॅट कमिंस (कर्णधार), एडम झम्पा आणि जोश हेजलवूड



Source link

Mazhar Paradise65

WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
x Logo: Shield Security
This Site Is Protected By
Shield Security
Verified by MonsterInsights