बॉलिवूडचा खेळ संपलाय…इंडस्ट्रीत एकता राहिलेली नाही : सुनील शेट्टी

बॉलिवूडचा खेळ संपलाय…इंडस्ट्रीत एकता राहिलेली नाही : सुनील शेट्टी


Suniel Shetty : संजय दत्त (Sanjay Dutt) आणि सुनील शेट्टी (Suniel Shetty) हे नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेते सध्या चर्चेत आहेत. ‘स्टार वर्सेज फूड सर्वाइवल’ ओटीटीवरच्या या कार्यक्रमातील पहिल्या भागात दोघेही दिसले. या विशेष भागात ते जेवण बनवताना दिसून आले. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी त्यांच्या मैत्रीवर, कामाबद्दल आणि बॉलिवूडबद्दल भाष्य केलं. 

‘द इंडियन एक्सप्रेस डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाले,”स्टार वर्सेस फूड सर्वाइवल’ हा मजेशीर कार्यक्रम आहे. संजय सोबत असल्याने आणखी मजा आली. आम्हा दोघांची रास सिंह असल्याने निसर्गाबद्दल कायमच एक वेगळं नातं राहिलं आहे. आता या कार्यक्रमाच्या माध्यमातून दोघांना एकत्र वेळ घालवता आला याचा आनंद आहे”. 

संजयने दिलं अण्णा नाव…

सुनील शेट्टीला आज इंडस्ट्री ‘अण्णा’ म्हणून ओळखते. याबद्दल बोलताना सुनील शेट्टी म्हणाला,”अण्णा’ हे नाव मला संजय दत्तने दिलं आहे. ‘कांटे’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान संजयने मला अण्णा या नावाने हाक मारायला सुरुवात केली. अडचणींमध्ये आम्ही कायमच एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलो आहोत”.

सुनील शेट्टी पुढे म्हणाला,”संजय आणि मी सोबत जेवण करायचो. शूटिंगच्या निमित्ताने आम्हाला एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवता आला आहे. आजही आम्ही एकत्र असतो. इतक्या वर्षांनंतर आजही आमची मैत्री कायम आहे”.  

बॉलिवूडबद्दल बोलताना सुनील शेट्टी म्हणाले,”बॉलिवूडचा खेळ आता संपला आहे. इंडस्ट्रीमधील एखाद्या समस्येवर आवाज उठवायला आजचे कलाकार मागे पडतात. आज इंडस्ट्रीमध्ये एकता राहिलेली नाही. एकमेकांना समजून घेणारे कमी पडले आहेत. पण इंडस्ट्रीत आता बदल व्हावा अशी इच्छा आहे. एकमेकांना साथ देण्याची आणि पाठिंबा देण्याची आता गरज आहे”. 

सुनील शेट्टी यांनी 1992 मध्ये ‘बलवान’ या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. 1994 मध्ये आलेला ‘मोहरा’ या सिनेमाने त्यांना सुपरस्टार बनवलं.  त्यानंतर  1994 मध्येच दिलवाले चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटामधील अभिनयासाठी सुनीलला अनेक पुरस्कार मिळाले.  

सुनील शेट्टींच्या सिनेमांबद्दल जाणून घ्या… (Suniel Shetty Movies)

‘सुरक्षा’, ‘टक्कर’, ‘रक्षक’, ‘सपूत’ , ‘पहचान’, ‘गोपी किशन’, ‘दिलवाले’, ‘कृष्णा’, ‘बॉर्डर’, ‘भाई’, ‘हु तू तू’, ‘रिफ्यूजी’, ‘कांटे’, ‘कयामत’, ‘मैं हूं ना’, ‘हलचल’, ‘शूटआउट एट लोखंडवाला’ , ‘आवारा पागल दीवाना’, ‘फिर हेरा फेरी’ , ‘मुंबई सागा’ यांसारख्या चित्रपटामध्ये सुनीलनं काम केलं. 

संंबंधित बातम्या

Suniel Shetty Birthday : 61 वर्षाचा झाला सुनील शेट्टी; जाणून घ्या कोट्यवधींचा मालक असणाऱ्या अभिनेत्याबद्दलSource link

MPardasi65

WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
x Logo: Shield Security
This Site Is Protected By
Shield Security
Verified by MonsterInsights