शामीच सिकंदर, विराट अन् अय्यर ठरले न्यूझीलंडसाठी ‘ताप’; टीम इंडियाकडून किवींचं आव्हान पार

शामीच सिकंदर, विराट अन् अय्यर ठरले न्यूझीलंडसाठी ‘ताप’; टीम इंडियाकडून किवींचं आव्हान पार


India vs New Zealand Semi Final 1st 2023: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं (Indian Cricket Team) दणक्यात फायनल्समध्ये (ICC World Cup 2023 Final) प्रवेश केला आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC World Cup) मध्ये  झंझावाती कामगिरी करत टीम इंडियानं (Team India) फायनलपर्यंतची मजल मारली आहे. टीम इंडियानं बुधवारी (15 नोव्हेंबर) न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध सेमी फायनल्सचा सामना खेळला आणि तब्बल 70 धावांनी किवी संघांचा धुव्वा उडवला. या विजयासह भारतीय क्रिकेट संघानं न्यूझीलंडकडून 2019 मँचेस्टरचा बदलाही घेतला आहे. खरं तर 2019 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ विश्वचषकाच्या सेमीफायनल्समध्ये किवी संघाकडून पराभूत झाला होता. आता रोहितसेनेनं त्याच पराभवाचा बदला किवींकडून घेतला आहे.

वर्ल्डकप ट्रॉफीपासून टीम इंडिया फक्त एक पाऊल दूर 

आता भारतीय क्रिकेट संघ तिसरा विश्वचषक जिंकण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. टीम इंडियानं विश्वचषकात आतापर्यंत धमाकेदार कामगिरी करत फायनलमध्ये धडक दिली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्डकप 2023 फायनल्सचा रंगतदार सामना 19 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. या फायनल्समध्ये टीम इंडिया दुसऱ्या सेमीफायनलमधील विजेत्या ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे.  

यंदाच्या वर्ल्डकपमधील दुसरा सेमीफायनलचा सामना गुरुवारी (16 नोव्हेंबर) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना या दुसऱ्या सेमीफायनलमधील विजेत्याशी होणार आहे. 

कोहली आणि श्रेयसची झंझावाती शतकी खेळी 

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकत सर्वात आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितनं घेतलेला हा निर्णय अगदी योग्य असल्याचं सामन्याच्या शेवटी सिद्ध झालं. भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना नमवलं. भारतीय क्रिकेट संघानं 4 विकेट्स गमावत 397 धावा केल्या. विरोट कोहलीनं सर्वाधिक 117 धावांची तुफानी खेळली. आपल्या याच खेळीच्या जोरावर विराटनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. तर श्रेयस अय्यरनं 105 धावा केल्या. शुभमन गिल 80 आणि केएल राहुल 39 धावांवर नाबाद राहिला. रोहित शर्मानं 47 धावांची तुफानी खेळी केली. तर, किवी संघाकडून टीम साऊदीनं 3 विकेट्स घेतले.

शामीच्या वेगासमोर किवींची दांडी गुल्ल 

दुसरीकडे, 398 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडचा संघ केवळ 327 धावाच करू शकला आणि सामना 70 धावांनी गमावला. किवी संघाकडून डॅरेल मिशेलनं 134 धावांची खेळी केली. तर कर्णधार केन विल्यमसननं 69 आणि ग्लेन फिलिप्सनं 41 धावा केल्या. भारतीय संघाकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीनं सर्वाधिक 7 विकेट्स चटकावल्या. याव्यतिरिक्त जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतला.

टीम इंडियाच्या नावे अनेक रेकॉर्ड्स 

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल (80) यांनी 8.2 षटकात 71 धावा जोडून शानदार सुरुवात केली. गिलही चांगलाच फॉर्मात दिसला, पण तो 79 धावांवर रिटायर्डहर्ट झाला. अखेरच्या षटकांमध्ये गिल पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात आला असला तरी त्याला शतक झळकावता आलं नाही. या सामन्यात विराट कोहलीनं एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील 50 वं शतक झळकावलं. विराट एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारा खेळाडू बनला आणि सचिन तेंडुलकरचा (49 शतकं) विक्रम मोडला. श्रेयस अय्यरनंही झंझावाती शतक झळकावलं. या सर्व विक्रमांच्या जोरावर टीम इंडियानं विश्वचषकाच्या सेमीफायनल्समध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही केला. यापूर्वी ऑस्ट्रेलियानं 26 मार्च 2015 रोजी सिडनी येथे टीम इंडिया विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये 328/7 (50) धावा केल्या होत्या.

Source link

Mazhar Paradise65

WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
x Logo: Shield Security
This Site Is Protected By
Shield Security
Verified by MonsterInsights