ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादवकडे संघाची धुरा; ‘या’ शिलेदारांची निवड

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादवकडे संघाची धुरा; ‘या’ शिलेदारांची निवड


IND vs AUS T20 India Squad :  वर्ल्ड कपनंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध  टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. टीम इंडियाची आज निवड समितीने घोषणा केली आहे. टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे.  ऋतुराज गायकवाडकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

विशाखापट्टणम व्यतिरिक्त या मालिकेतील सामने तिरुअनंतपुरम, गुवाहाटी, नागपूर आणि हैदराबाद येथे होणार आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचे सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेळवले जातील.

 

टी-20 मालिकेचे वेळापत्रक कसे आहे?

– पहिला सामना- २३ नोव्हेंबर, गुरुवार, राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम
– दुसरा सामना- २६ नोव्हेंबर, रविवार, ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम
– तिसरा सामना- 28 नोव्हेंबर, मंगळवार, बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
– चौथा सामना- ०१ डिसेंबर, विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
– पाचवा सामना- 03 डिसेंबर, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ : Team India For T-20 Series 

सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), ईशान किशन, यशस्वी जयस्वाल, टिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार

भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ :

मॅथ्यू वेड (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, टीम डेव्हिड, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, जोश इंग्लिस, तन्वीर संघा, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, स्पेन्सर जॉन्सन, अॅडम झम्पा.

इतर संबंधित बातमी :





Source link

Avatar Of Mazhar Paradise65

Mazhar Paradise65

WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
x Logo: Shield Security
This Site Is Protected By
Shield Security
Verified by MonsterInsights