जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या


Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या…

Ira Khan Nupur Shikhare Wedding : आमिर खानची लेक अडकली लग्नबंधनात; मराठमोळ्या नुपूर शिखरेसोबत कोर्ट मॅरेज करत बांधली लग्नगाठ

Ira Khan Nupur Shikhare : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची (Aamir Khan) लेक आयरा खान (Ira Khan) लग्नबंधनात अडकली आहे. मराठमोळा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) कोर्ट मॅरेज करत तिने लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या रजिस्टर मॅरेज आणि रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Javed Akhtar : जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान

Javed Akhtar in Ajanta Ellora International Film Festival : अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन (Ajanta Ellora International Film Festival) सोहळा नुकताच पार पडला आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनादरम्यान पद्मभूषण जावेद अख्तर (Javed Akhtar) यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी भारतीय सिनेमाचे भविष्य सामान्य नागरिक ठरवतील, असं जावेद अख्तर म्हणाले.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Neha Pendse : मराठी अभिनेत्रीच्या घरात चोरट्याचा धुमाकूळ, 6 लाखांचा मुद्देमाल केला लंपास

मुंबई : मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) हिच्या घरात चोरट्याने चांगलाच धुमाकूळ घातलाय. नेहाच्या घरातून चोरट्याने 6 लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय. या प्रकरणी तिच्या ड्रायव्हरने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. वांद्रे (Bandra) येथे असणाऱ्या तिच्या घरातून हा मुद्देमाल लंपास करण्यात आलाय. ही घटना 28 डिसेंबर रोजी घडली. सोन्याच्या बांगड्या, हिरा बसवण्यात आलेली अंगठी अशी एकूण 6 लाखांची चोरी करण्यात आली आहे. या प्रकरणी नेहा पेंडसेच्या नोकरास पोलिसांकडून (Police) अटक करण्यात आलीये.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Shivrayancha Chhava : दिग्पाल लांजेकराच्या आगामी चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज

Shivrayancha Chhava Teaser Out: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar)  यांच्या “शिवरायांचा छावा” (Shivrayancha Chhava) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. दिग्पाल यांचा  ‘सुभेदार’ (Subhedar)  हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला होता. आता त्यांचा शिवरायांचा छावा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Deepika Padukone : वयाच्या 37 व्या वर्षी दीपिका पादुकोण आई होणार?

Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) हे बॉलिवूडचं लोकप्रिय ‘पॉवर कपल’ आहे. दीपिका आणि रणवीरची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरते. त्यांच्या लग्नाला आता पाच वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. अशातच आता अभिनेत्री आई होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक कराSource link

Mazhar Paradise65