कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार थलापती विजयचा ‘लियो’ चित्रपट? जाणून घ्या

कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार  थलापती विजयचा ‘लियो’ चित्रपट? जाणून घ्या


Leo OTT Release Date Announced: अभिनेता थलापती विजयच्या (Vijay Thalapathy) लियो (Leo) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. लियो हा चित्रपट 19 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. लियो हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची अनेक जण वाट बघत होते. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. कारण थलापती विजयचा लियो हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होत आहे. हा चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे? याबाबत जाणून घेऊयात..

कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज? (Leo OTT Release )

थलापती विजयचा लियो हा चित्रपट नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लियो या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची माहिती देण्यात आली आहे. हा चित्रपट  24 नोव्हेंबर रोजी भारतात आणि 28 रोजी जगभरात नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. हा चित्रपट तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये ओटीटीवर रिलीज होणार आहे.

लियोची स्टार कास्ट

लियो या चित्रपटात थलपथी विजयसोबतच  संजय दत्त (Sanjay Dutt), त्रिशा कृष्णन, प्रिया आनंद, गौतम वासुदेव मेनन आणि मन्सूर अली खान या कलाकारांनी देखील काम केलं आहे. लियो या चित्रपटाचं दिग्दर्शन लोकेश कनागराज यांनी केले आहे.

त्रिशा कृष्णनने या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे. ती या चित्रपटात विजयच्या  पत्नीच्या भूमिकेत दिसली आहे. तर संजय दत्तने खलनायकाची भूमिका साकारली आहे. सेव्हन स्क्रीन स्टुडिओ निर्मित, ‘लिओ’ चित्रपटाला अनिरुद्ध रविचंदरने संगीत दिले होते. चित्रपटाचा सिनेमॅटोग्राफर मनोज परमहंस हा आहे.

लव्ह टुडे,पूवे उनाक्कागा , प्रियामुदन,थुल्लाधा मनामुम थुल्लुम, कधालुक्कू मरियाधाई ,थुप्पक्की,कठ्ठी या  विजयच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.  विजयच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Leo Box Office Collection : थलापती विजयचा ‘लियो’ सुपरहिट! पहिल्याच दिवशी सहा रेकॉर्डसह बॉक्स ऑफिसवर पडला पैशांचा पाऊस

Source link

MPardasi65

WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
x Logo: Shield Security
This Site Is Protected By
Shield Security
Verified by MonsterInsights