अनुष्का आणि अथियाबाबत हरभजननं केलेल्या कमेंटवर भडकले नेटकरी

अनुष्का आणि अथियाबाबत हरभजननं केलेल्या कमेंटवर भडकले नेटकरी


World Cup 2023: विश्वचषकाच्या फायनलमध्ये (World Cup 2023) ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा (India Vs Aus)  पराभव केला. विश्वचषक विजयाचे स्वप्न भंगल्यामुळे संपूर्ण देश नाराज झाला आहे. मॅच बघायला अनेक बॉलिवूड स्टार्स अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium)  दाखल झाले होते. विराट कोहलीची (Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि के. एल राहुलची (KL Rahul) पत्नी अथिया शेट्टी या देखील टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गेल्या होत्या. अथिया आणि अनुष्का यांचे नरेंद्र मोदी स्टेडियम येथील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हरभजन सिंह (Harbhajan Singh) हा कॉमेंट्री करताना अनुष्का आणि अथिया यांच्या नावाचा उल्लेख करत आहे, असं ऐकू येत आहे. या व्हिडीओमध्ये हरभजननं अनुष्का आणि अथिया यांच्याबाबत कमेंट करताना दिसत आहे.

हरभजननं  केलेली कमेंट

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मॅचदरम्यान, कॅमेरा अनुष्का आणि अथिया यांच्याकडे वळतो, तेव्हा दोघेही एकमेकांशी बोलताना दिसले. ज्यावर हरभजन सिंह म्हणतो, “मला वाटतं की कदाचित या दोघी चित्रपटांबद्दल बोलत असतील. कारण अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीला क्रिकेटबद्दल फारशी माहिती नसेल, असं मला वाटतं”

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

हरभजन सिंहनं कॉमेंट्री  अनुष्का आणि अथिया यांच्याबाबत केलेल्या   “बायकांना क्रिकेट कळतं की नाही, असं हरभजनला म्हणायचं काय?? लगेच माफी मागाव”, असं ट्वीट एका नेटकऱ्यानं केलं आहे. तर दुसऱ्या युझरनं ट्वीट केलं, “हे बरोबर नाहीये, हे कूल वाटत नाही”

इतर महत्वाच्या बातम्या:

World Cup Final: शाहरुखपासून दीपिकापर्यंत! फायनलचा महामुकाबला पहायला कलाकारांची मांदियाळी जमली

Source link

Avatar Of Mazhar Paradise65

Mazhar Paradise65

WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
x Logo: Shield Security
This Site Is Protected By
Shield Security
Verified by MonsterInsights